Saturday, October 5, 2024

वणीच्या गडावर कोण ग उभी

वणीच्या गडावर कोण ग उभी ?

राखण करते सप्तशृंगी,

अंबिका, धाव पाव लवकर नी

येऊ दे गडावरी ...

अंबिका, धाव पाव लवकर नी

येऊ दे गडावरी ... || धृ ||


औंदाचा नवस बाई मी

कापुराचा केला ग...

नवसाला पावली सप्तशृंगी

कापूर लावतो पायरीवरी

अंबिका, धाव पाव लवकर नी

येऊ दे गडावरी ...

अंबिका, धाव पाव लवकर नी

येऊ दे गडावरी ... ||१ ||



औंदाचा नवस बाई मी

नारळाचा केला ग

नवसाला पावली सप्तशृंगी

नारळ फोडतो पायरीवरी

अंबिका, धाव पाव लवकर नी

येऊ दे गडावरी ...

अंबिका, धाव पाव लवकर नी

येऊ दे गडावरी ... || २ ||


औंदाचा नवस बाई मी

रोडग्याचा केला ग

नवसाला पावली सप्तशृंगी

रोडगे शेकतो तुझ्या दरबारी

अंबिका, धाव पाव लवकर नी

येऊ दे गडावरी ...

अंबिका, धाव पाव लवकर नी

येऊ दे गडावरी ... || ३ ||



वणीच्या गडावर कोण ग उभी ?

राखण करते सप्तशृंगी,

अंबिका, धाव पाव लवकर नी

येऊ दे गडावरी ...

अंबिका, धाव पाव लवकर नी

येऊ दे गडावरी .. ||४||

डम डम डम डम डमरू वाला

डम डम डम डम डमरू वाला | 

डम डम डमरूवाला 

पार्वती पती कैलासवाला 

शंकरा, शरण आलो तुला न दर्शन दे रे मला 

शंकरा, शरण आलो तुला न दर्शन दे रे मला


तुझ्या कपाळा भस्माचा टीळा, 

तुझ्या कपाळा भस्माचा टीळा, 

शंकरा, शरण आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा, 

शरण आलो तुला न दर्शन दे रे मला 


तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा , 

तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा, 

शंकरा, शरण आलो तुला न दर्शन दे रे मला 

शंकरा, शरण आलो तुला न दर्शन दे रे मला 


तुझ्या हातामाध्ये त्रिशूळ भाळा, 

तुझ्या हातामाध्ये त्रिशूळ भाळा , 

शंकरा, शरण आलो तुला न दर्शन दे रे मला 

शंकरा, शरण आलो तुला न दर्शन दे रे मला 


तुझ्या गळया मध्ये सर्पाच्या माळा , तुझ्या गळया मध्ये सर्पाच्या माळा,

शंकरा, शरण आलो तुला न दर्शन दे रे मला 

शंकरा, शरण आलो तुला न दर्शन दे रे मला 


तुझ्या सेवेला नंदी हा आला, 

तुझ्या सेवेला नंदी हा आला, 

शंकरा, शरण आलो तुला न दर्शन दे रे मला 

शंकरा, शरण आलो तुला न दर्शन दे रे मला 


डम डम डम डम डमरू वाला | 

डम डम डमरूवाला 

पार्वती पती कैलासवाला शंकरा, 

शरण आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा, 

शरण आलो तुला न दर्शन दे रे मला

Monday, October 11, 2021

जाऊ जोगव्याला

 

चला ग आयो बयोनो आपण जाऊ जोगव्याला

जाऊ जोगव्याला, आईचा जोगवा मागायला


माझ्या परडीत कोणी वाढिले गहू

वाढिले गहू , सुखी राहूदे बहिण भाऊ


माझ्या परडीत कोणी वाढिली डाळ

वाढिली डाळ , सुखी राहूदे माझे बाळ


माझ्या परडीत कोणी वाढिले तांदूळ

वाढिले तांदूळ, घालू अंबेचा गोंधळ


टाळ वाल्या दादा वाजव दमान

वाजव दमान, आई भिजली घामान


पेटी वाल्या दादा पेटी वाजव सुराव

वाजत सुराव, आई आलीये मोरावं


ढोल वाल्या दादा ढोल वाजव तालात 

वाजव तालात आई हसली गालात 

खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली

 

खंडेरायाच्या लग्नाला  ~~

बानू नवरी नटली~

खंडेरायाच्या लग्नाला~~

बानू नवरी नटली~

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


खंडेरायाच्या लग्नाला  ~~

बानू नवरी नटली~

खंडेरायाच्या लग्नाला~~

बानू नवरी नटली~

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


खंडेरायाच्या लग्नाला गं ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


आलं वऱ्हाड कोन कोन ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


खंडेरायाच्या लग्नाला गं ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


आलं वऱ्हाड कोन कोन ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


संग सरस्वती घेउनं

आले गणपती गजानन~ 


आले गणपती गजानन ~

आले गणपती गजानन ~


संग सरस्वती घेउनं

आले गणपती गजानन ~


आले गणपती गजानन ~

आले गणपती गजानन ~


त्या साखरपुड्याची आज बाई साखर वाटली

त्या साखरपुड्याची आज बाई साखर वाटली


नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


खंडेरायाच्या लग्नाला गं ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


आलं वऱ्हाड कोन कोन ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


खंडेरायाच्या लग्नाला गं ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


आलं वऱ्हाड कोन कोन ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


संग पार्वती घेऊन ~~

आले शंकर भगवान ~


आले शंकर भगवान ~

आले शंकर भगवान ~


संग पार्वती घेऊन ~~

आले शंकर भगवान ~


आले शंकर भगवान ~

आले शंकर भगवान ~


तेहत्तीस कोटी देवांची तिथं गर्दी दाटली ~

तेहत्तीस कोटी देवांची तिथं गर्दी दाटली ~


नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


खंडेरायाच्या लग्नाला गं ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


आलं वऱ्हाड कोन कोन ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


खंडेरायाच्या लग्नाला गं ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


आलं वऱ्हाड कोन कोन ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


संग लक्ष्मी ला घेउन

आले विष्णू नारायण ~


आले विष्णू नारायण ~

आले विष्णू नारायण ~


संग लक्ष्मी ला घेउन

आले विष्णू नारायण ~


आले विष्णू नारायण ~

आले विष्णू नारायण ~


या जेजुरी गडावर सारी डिकमल पेटली~~ 

या जेजुरी गडावर सारी डिकमल पेटली~~ 


नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


खंडेरायाच्या लग्नाला गं ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


आलं वऱ्हाड कोन कोन ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


खंडेरायाच्या लग्नाला गं ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


आलं वऱ्हाड कोन कोन ~

आलं वऱ्हाड कोन कोन ~


बाळ परसराम घेउन

आली अंबिका गवळण ~


आली अंबिका गवळण ~

आली अंबिका गवळण ~


बाळ परसराम घेउन

आली अंबिका गवळण ~


आली अंबिका गवळण ~

आली अंबिका गवळण ~


खंडेरायला बाणाई चंदनपुरात भेटली

खंडेरायला बाणाई चंदनपुरात भेटली


नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


खंडेरायाच्या लग्नाला  ~~

बानू नवरी नटली~

खंडेरायाच्या लग्नाला~~

बानू नवरी नटली~

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली


नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

हालगी वाजते

 


आई राजा उदो उदो.. येडुसरी चा उदो उदो....

चैती पौरणीमेची थाट.. भक्तांचा गजबजात.. 

लाईती चा लक लकाट दारु गोळ्या चा कड कडाट ... 

पालखी हरान तुरीन आबदागीर न  साजती

पुढं बाई रगऩ रगऩ रगऩ रगऩ हलगी वाजती ......


शिंग वाजलं तुतारी आले खांद्याचे मानकरी 

जवा निघाली येडुसरी न पाटला च्या वाड्या वरी

पाई घोड्याची पाऊल वाट पुढं लागला बाले घाट

कुणा कुणा ला देऊन भेट झाली वाड्यात गर्दी दाट

भक्ती भावान जिवान येडुला माझ्या पुजती

पुढं बाई.....


गेली माने चौकातून राखीला चुन्याचा रान 

चुना वेचीला भक्तांन पाहता हरली भुकताण

आली भक्तीची हो लाट वर एकच थरथराट 

अंगावरती फुटला खाट धरली राशी कडली वाट 

सारी लहान थोरान उदगारान गर्जती...


पुढ अमराई बनात असल्या ऊना ग तानात 

कवड्या दिसती त्या क्षणात बसली भक्तांच्या मनात

आली डेऱ्या मधी थेट येडाबाईच महत्त्व मोठ 

पाच दिवसाचा ललाट तान्हा भाऊच्या ह्रदयी जात 

येडु चंदनाच्या गाण्या मध्यी गाजती....


चैती पौरणीमेची थाट.. भक्तांचा गजबजात.. 

लाईती चा लक लकाट दारु गोळ्या चा कड कडाट ... 

पालखी हरान तुरीन आंबा त्यात साजती

पुढं बाई रगऩ रगऩ रगऩ रगऩ हलगी वाजती ......

विठ्ठलाची आरती (येई हो विठ्ठला)

 

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥

निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥


आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥

पंढरपुरी आहे माझा मायबाप॥ १ ॥


पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥

गरुडावरी बैसून माझा कैवारी आला॥ २ ॥


विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥

विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी॥ ३ ॥


असो नसो भाव आम्हा तुझी या ठाया ||

कृपा दृष्टी राहे माझा पंढरी राया || ४ || 

विठ्ठलाची आरती (युगे अठठावीस)


युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा

पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥


जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥


तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी

कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।

देव सुरवर नित्य येती भेटी

गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥


धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।

राई रखुमाबाई राणीया सकळा

ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥


ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती

चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।

दिण्ड्या पताका वैष्णव नाचती

पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥


आषाढी कार्तिकी भक्तजन येती

चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।

दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति

केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥

Sunday, September 19, 2021

आई उदे ग अंबा बाई आई उदे ग अंबा

 


आई उदे ग अंबा बाई आई उदे ग अंबा

        आई पहिला उपवास केला तो सोमवार केला

        तो सोमवार केला तो शंकराला दिला ||१||

आई उदे ग अंबा बाई आई उदे ग अंबा बाई


        आई दुसरा उपवास केला तो मंगळवार केला

         तो मंगळवार केला तो गणपतीला दिला ||२||

आई उदे ग अंबा बाई आई उदे ग अंबा बाई


        आई तिसरा उपवास केला तो बुधवार केला

        तो बुधवार केला तो विठ्ठलाला दिला ||३||

आई उदे ग अंबा बाई आई उदे ग अंबा बाई


        आई चौथा उपवास केला तो गुरुवार केला

        तो गुरुवार केला तो दत्तात्रेयला दिला ||४||

आई उदे ग अंबा बाई आई उदे ग अंबा बाई


        आई पाचवा उपवास केला तो शुक्रवार केला

        तो शुक्रवार केला तो जीवदानी आई ला दिला ||५||

आई उदे ग अंबा बाई आई उदे ग अंबा बाई


        आई साहवा उपवास केला तो शनिवार केला

        तो शनिवार केला तो मारुतीला दिला ||६||

आई उदे ग अंबा बाई आई उदे ग अंबा बाई


        आई सातवा उपवास केला तो रविवार केला

        तो रविवार केला तो खंडोबाला दिला ||७||

आई उदे ग अंबा बाई आई उदे ग अंबा बाई

भोळ्या भागताच्या घरी गोंधळाला ये ग

 


अग भोळ्या भागताच्या घरी गोंधळाला ये ग

भोळ्या भागताच्या घरी गोंधळाला ये ग 

गोंधळाला ये ग..., मान कुंकवाचा घे ग


जवस भरला अंबाबाई माणिक-मोत्याचा

माणिक-मोत्याचा...,धूप-अगरबत्त्याचा

भोळ्या भागताच्या घरी गोंधळाला ये ग 

गोंधळाला ये ग..., मान कुंकवाचा घे ग


हे नवस केला तुला वाहीन पाळणा सोन्याचा

अन पाळणा सोन्याचा ,दिवा लावेन लोण्याचा

भोळ्या भागताच्या घरी गोंधळाला ये ग 

गोंधळाला ये ग..., मान कुंकवाचा घे ग


अरे खंडे-खंडे तूप जळे होम पूजे साठी

होम पूजे साठी ,अंबा येना भेटी साठी

भोळ्या भागताच्या घरी गोंधळाला ये ग 

गोंधळाला ये ग..., मान कुंकवाचा घे ग


आई अंबाबाई माझी आली गोंधळाला

आली गोंधळाला ,जरा वाजवा संबळाला

भोळ्या भागताच्या घरी गोंधळाला ये ग 

गोंधळाला ये ग..., मान कुंकवाचा घे ग


सवर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ

पैठणीचा घोळ ,रंगला गोंधळाचा खेळ

भोळ्या भागताच्या घरी गोंधळाला ये ग 

गोंधळाला ये ग..., मान कुंकवाचा घे ग


खेळ खेळे अंबाबाई गोंधळाच्या पारी

अहो गोंधळाच्या पारी, भक्त हरी खाले भारी

भोळ्या भागताच्या घरी गोंधळाला ये ग 

गोंधळाला ये ग..., मान कुंकवाचा घे ग

खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन

 


असा कसा हा देव येडा झाला पहा कशी नवलाई 

शिव अवतारी तुझीच पार्वती तीच हि बानू बाई 


येळकोट येळकोट जय मल्हार 

सदानंदाचा विजय असो 


देव अधिपती कशी हरली त्याची मती

एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिन 

त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन 

खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....


जाऊन चंदनपुराला पाहतोय बानूच्या घराला 

जाऊन चंदनपुराला पाहतोय बानूच्या घराला 

भुरळ पडली येडा झाला देव भुलूनी कसा गेला 

होता तिचा पण आला पूर्ण तो करून 

तिला घालून पैंजण म्हणे तुला मी सांभाळीन 

त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन 

खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....


बानूला ठेउनी मनात जागुनिया दिनरात 

बानूला ठेउनी मनात जागुनिया दिनरात 

राहून साऱ्या धनगरात खातोय भातामध्ये ताक 

ध्यास होता मनी तिला वाचनात गुंतुनी 

म्हणे होतो मी तुझा धनी जानी अंतरीच्या खुनी 

त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन 

खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....


जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा 

जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा 

योग जीवाशी शिवाचा देव खंडोबा नावाचा 

तोच आदीनाथ त्यांनी दावली जगी रीत 

तीच आली कलियुगात सांगे साऱ्याला चंदन 

खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन 

खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....


देव अधिपती कशी हरली त्याची मती

एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिन 

त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन 

खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....

आई भवानी तुझ्या कृपेने

 आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला

अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आज गोंधळाला ये ....


गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये


उधं उधं उधं उधं उधं


गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ

हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ

धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता

भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आज गोंधळाला ये ....


गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये


उधं उधं उधं उधं उधं


अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा

हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा

अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला

महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला


आज आम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरी

अंबे गोंधळाला ये


गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये


अंबाबाईचा ..... उधं उधं उधं उधं उधं

बोल भवानी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं

नदीच्या पल्याड आईचा डोंगर

नदीच्या पल्याड आईचा डोंगर

नदीच्या पल्याड आईचा डोंगुर

डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर

घालु जागर जागर डोंगरमाथ्याला

घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार

आलो दुरुन, रांगून, डोंगरडों येंगून, उघड देवी दार

नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं

तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं

नाद आला ग आला ग जिवाच्या घुंगराला

घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार

आलो दुरुन, रांगून, डोंगरडों येंगून, उघड देवी दार

नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू

हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी र्‍हाव तू

देवी माझ्या अंतरी र्‍हाव तू, काम क्रोध परतुनी लाव तू

काम क्रोध परतुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू

डोळा भरून तुझी मुरत पाहीन

मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन

महिमा गाईन, तुला घुगर्‍या वाहीन

घुगर्‍या वाहीन, तुझा भंडारा खाईन

दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला

घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार

आलो दुरुन, रांगून, डोंगरडों येंगून, उघड देवी दार

यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर

निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं

पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर

आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर

खणा-नारळानं वटी मी भरीन

वटी मी भरीन, तुझी सेवा करीन

सेवा करीन, तुझा देवारा धरीन

देवारा धरीन, माझी वंजळ भरीन

आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला

घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार

आलो दुरुन, रांगून, डोंगरडों येंगून, उघड देवी दार

यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर

निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं

पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर

आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर



रुसला का मजवरी मल्हारी



रुसला का मजवरी मल्हारी, रुसला का मजवरी जी
बानू नार आणली घरी मल्हारी रुसला का मजवरी जी
रुसला का मजवरी मल्हारी, रुसला का मजवरी जी

लखलख दिवट्या जळती, पाजळली दीपमाळ
पाजळली दीपमाळ
रुसला का मजवरी मल्हारी, रुसला का मजवरी जी

कडेकपारी त्रिशूलद्वारी, वर उधळे भंडार
वर उधळे भंडार
नाथ निरंजन सद्‍गुरू स्वामी घेतलासे अवतार
घेतलासे अवतार देवा लोटलासे भंडार
रुसला का मजवरी मल्हारी, रुसला का मजवरी जी

मल्हारधनी मी म्हाळसा राणी
कर जोडुनी लागतो चरणी
प्रीत नको तुजवरी, प्रीत नको तुजवरी
रुसला का मजवरी मल्हारी, रुसला का मजवरी जी

Sunday, August 22, 2021

श्रीजेजुरलींगा आरती

 

पिवळ्या वाघ्या झळके पिवळा करीयेला | 

भांडाराचे उधळण पिवळा गड किल्ला |

पिवळे निशाण फडके दैत्यावर हल्ला |

पिवळे तुरुंग झळके मारीसी मरीमल्ला ||१||

जयदेव जयदेव जय जेजुरलिंगा

हेलकोट म्हणता परीपातक ब्रम्हा ||धृ||


माहा चैत्र यात्रा नवरात्र दाटी |

चंपाषष्ठी उत्सव तीळ गुळा कोटी |

दिवट्याचा लखलखाट जग महिमा मोठी | 

श्रवणे सृष्टी करीता स्वामी जग जेठी ||२||

        जयदेव जयदेव जय जेजुरलिंगा

हेलकोट म्हणता परीपातक ब्रम्हा ||धृ||


गंगा गौरी सहीत शंकर अवतारी |

तारी भाविक लोका दानव अपहारी |

वारी मल्हारीची भव विघ्ने निवारी |

आनंददास विनवी भक्त कैवारी ||३||

        जयदेव जयदेव जय जेजुरलिंगा

हेलकोट म्हणता परीपातक ब्रम्हा ||धृ||


श्रीखंडेरायाची आरती (पिवळे निशाण)

 

पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर |

पिवळा कांचन पर्वत पिवळा भांडार |

पिवळे देऊळ तुमचे पिवळे नगर |

पिवळे तुम्ही राज राणी सुकुमार ||१||

जयदेव जयदेव जय शिव मैराळा

विराज शंकर ढवळा त्याहुनी तो पिवळा ||धृ||


पिवळी जनयात्रा पिवळा बाजार |

पिवळे देणे घेणे घडमोड व्यवहार |

पिवळी तुमची काया पिवळा शृंगार |

हाती शोभे फिरंग पिवळी तलवार ||२||

        जयदेव जयदेव जय शिव मैराळा

विराज शंकर ढवळा त्याहुनी तो पिवळा ||धृ||


पिवळी बाणा बाई धन चरणी बाळा |

पिवळ्या पुरणाची आरती देवाला |

चारही वाद्ये वाजती देवाची सकळा |

दासी झाल्या मुरळ्या भोगसी सोहळा ||३||

        जयदेव जयदेव जय शिव मैराळा

विराज शंकर ढवळा त्याहुनी तो पिवळा ||धृ||


चंपाषष्ठीचा कुळ धर्म केला |

पिवळ्या पुरणाची आरती देवाला |

आनंद शिवराज झालासे पिवळा |

त्यावरी कृपा केली पिवळ्या मैराळा ||४||

        जयदेव जयदेव जय शिव मैराळा

विराज शंकर ढवळा त्याहुनी तो पिवळा ||धृ||

श्रीनवरात्र आरती (अश्विन शुद्ध)


अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनी हो

मूलमंत्र जप करुनी भोंवते रक्षक ठेवूनी हो । ब्रह्माविष्णू रुद्र आ‌ईचे पूजन् करीती हो ॥१॥


उदो बोला उदो बोला अंबाबा‌ई मा‌ऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥धृ॥


द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो । सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो

कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो । उदोकारे गर्जती सकळा चामुंडा मिळोनी हो ॥२॥


तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो । मळवट, पातळ-चोळी कंठी हार मुक्ताफळा हो

कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥३॥


चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो । उपासका पहासी प्रसन्न अंत:करणी हो

पूर्णकृपे पहासी जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या मा‌ऊली सूर ते येती लोटांगणी हो ॥४॥


पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो । आर्धपाद्य पुजनें तुजला भवानीस्तविती हो

रात्रीचे सम‌ई करिती जागरण हरि कथा हो । आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रिडता हो ॥५॥


षष्टीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो । घेवुनी दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो

कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो । जोगवा मागता प्रसन्न झाली मुक्ताफळा हो ॥६॥


सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो । तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो

शेवंती जा‌ईजु‌ई पूजा रेखीयली बरवी हो । भक्त संकटी पडता झेलुनी घेसी वरचे वरी हो ॥७॥


अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो । संह्याद्री पर्वती उभी पाहिली जगत्जननी हो

मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो । स्तनपान दे‌ऊनी सुखी केले अंत:करणी हो ॥८॥


नवमीचे दिवशी नवदिवसांचे पारणे हो । सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो

षड्रस अन्ने नैवेद्याशी अर्पियली भोजनी हो । आचार्य ब्राह्मणा तृप्त त्वा केले कृपे करुनी हो ॥९॥


दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो । सिंव्हारुढ संबळ शस्त्रे अंबे त्वा लेवुनी हो

शुंभनिशूंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो । विप्ररामदासा आश्रय दिधला तव चरणी हो ॥१०॥


श्रीदेवीची आरती (दुर्गे दुर्गट)

 

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥

वारी वारीं जन्ममरणाते वारी ।

हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

        जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

        सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥


त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।

चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥

साही विवाद करितां पडिले प्रवाही ।

ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

        जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

        सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥


प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।

क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥

अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।

नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

        जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

        सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥


श्रीशंकराची आरती

 

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।

तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

        जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

        आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥


कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।

अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥

        जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

        आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥


देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।

त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥

तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ ३ ॥

        जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

        आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥


व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ ४ ॥

        जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

        आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

श्रीगणपतीची आरती

 

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।

सर्वांगी सुन्दर उटि शेंदुराची।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची ||१||

    जय देव जय देव जय मंगलमूर्ति।

    दर्शनमात्रे मनकामना पुरती॥


रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।

चंदनानाची उटि कुंकुमकेशरा।

हिरे जड़ित मुकुट शोभतो बरा।

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ||२||

    जय देव जय देव जय मंगलमूर्ति।

    दर्शनमात्रे मनकामना पुरती॥


लंबोदर पीताम्बर फणिवर बन्धना।

सरळ सोण्ड वक्रतुण्ड त्रिनयना।

दास रामाचा वाट पाहे सदना

संकटी पावावे निर्वाणीरक्षावे सुरवरवन्दना॥

    जय देव जय देव जय मंगलमूर्ति।

    दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

नवरात्रउत्सवातील आरती आणि देवीची गाणी

            नवरात्र उत्सव हा आपल्या हिंदू संस्कृती मध्ये एक महत्त्वाचा उत्सव समजला जातो. पण खास करून घटस्थापना म्हणून साजरा केला जातो. ह्या नऊ दिवसासाठी देवी आणि देव घटी बसले आहेत असे समजले जाते. काही पुराणात तर ह्या नऊ दिवसांमध्ये आदिशक्तीच आणि महिषासुर राक्षसासोबत तुंबळ युद्ध चालू होते आणि शेवटच्या दिवशी आदिशक्ती महिषासुर राक्षसाचा वध करते अशीही आख्यायिका आहे.  

            आश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला देवीच्या घटांची स्थापना केली जाते. म्हणून ह्या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुळाच्या देवता म्हणजे कुळदेव आणि कुळस्वामिनी याचं स्मरण म्हणून देवी देवतांच्या आरत्या आणि गाणी गाऊन जागरण केले जाते.

१. श्रीगणपतीची आरती

२. श्रीशंकराची आरती

३. श्रीदेवीची आरती (दुर्गे दुर्गट)

४. श्रीनवरात्र आरती (अश्विन शुद्ध)

५. श्रीखंडेरायाची आरती (पिवळे निशाण)

६. श्रीजेजुरलींगा आरती

७. आईचा जोगवा

८. मिठा पिठाचा जोगवा

९. दे बाई दे जोगवा दे 

१०. याग कोल्हापुरी

११. देवीच्या देऊळात 

१२. जीवदानी माता पडते मी पाया

१३. श्रीजीवदानी देवीची आरती

१४. माहूर गडावरी

१५. जय श्रीविश्वमाता

१६. श्रीकुलस्वामिनी

१७. आरती फुलवरा

१८. आरती देव्हारा

१९. जेजुरीच्या खंडेराया

२०. रुसला का मजवरी मल्हारी

२१. खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन

२२. खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली

२३. भोळ्या भागताच्या घरी गोंधळाला ये ग

२४. आई भवानी तुझ्या कृपेने

२५. आई उदे ग अंबा बाई आई उदे ग अंबा

२६. वणीच्या गडावर कोण ग उभी

२७. नदीच्या पल्याड आईचा डोंगर

२८. हालगी वाजते

२९. जाऊ जोगव्याला

३०. डम डम डमरूवाला

३१. श्रीदत्ताची आरती

३२. विठ्ठलाची आरती (युगे अठठावीस)

३३. विठ्ठलाची आरती (येई हो विठ्ठला)

३४. विडा घ्याहो अंबाबाई

३५. करुणाष्टके

 

Wednesday, August 11, 2021

विडा घ्याहो अंबाबाई

 


विडा घ्यावो अंबाबाई | जगत जननी माझे आई | 

विनवितो दास प्रेमे | हस्त जोडोनिया आई | 

विडा घ्यावो अंबाबाई ||


त्रिगुण पुगीफळ | चूर्ण केले निर्मळ | 

भावार्थ कापुराने | रंगविले सोज्ज्वळ | 

विडा घ्यावो अंबाबाई ||


प्रपंच पक्व पाने | हाती घेऊनि विवेकाने | 

द्वैतभाव जाळूनिया | वरी लाविला चुना | 

विडा घ्यावो अंबाबाई ||


भावार्थ शुभ्र कात | प्रेम लवंग त्यात | 

सुवासिक सर्व द्रव्ये | मेळविली समस्त | 

विडा घ्यावो अंबाबाई || 


जय जय कुलदेवते | आदिशक्ती मूळमाते | 

घेउनी विडा हाती | हरी तुझ विनवितो | 

विडा घ्यावो अंबाबाई ||

करुणाष्टके



जय परात्परे पूर्ण चिन्मये, भगवती महा मंगलालये । 

अगाध ईश्वरी विश्व व्यापिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।१।।


दीन वत्सले पाय दाखवी, तारि भैरवी या भवार्णवि । 

निवारि तापावो आनंद दायिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।२।।


प्रपंच काननी टाकिले मला, मार्ग चूकलो ध्यातसे तुला । 

तुझे कृपे विणे भय कसे चुके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।३।।


परम मूढवो जाण निश्चये, घडे मनासी हे नाम हि न ये । 

म्हणवितो तुझा रंक कालिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।४।।


विषय जाळिया चहूकडे अती, काम क्रोध हे व्याघ्र गर्जती । 

राख संकटी भ्रांती नाशिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।५।।


हेची मागणे लाविसी मनि, हृदय ग्रंथी हे छेदी योगिनी । 

नुपेक्षी कदा भक्त पालिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।६।।


आश्रयो नसे आणखी जनी, बालकासी तू सांडीसि वनी । 

धाव घे कडे, माये रेणुके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।७।।


काही नाठवे विचार हि मनी, वृथा भ्रमतसे दिवस यामिनी । 

प्रकट होय तू ज्ञान दीपिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।८।।


श्रीदयानिधे त्रिपुर सुंदरी, सर्व साक्षिणी भेटी लवकरी । 

गोसावी नंदना विनवी चंडिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।९।। 

श्रीदत्ताची आरती

 


त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।

त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।

नेती नेती शब्द न ये अनुमाना॥

सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥


जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।

आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥


सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।

अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥

पराही परतली तेथे कैचा हेत ।

जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥


दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।

भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥

प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।

जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥


दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।

हरपले मन झाले उन्मन ॥

मी तू पणाची झाली बोळवण ।

एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥


जेजुरीच्या खंडेराया


यळकोट यळकोट !!!! जय मल्हार !!!


जेजुरीच्या खंडेराया जागराला या या

वाईच्या तू गणराया जागराला या या


जेजुरगडा वाजे चौघडा वाजे चौघडा

पुणं धर्ती ही पलिकडं, गड जेजुरी अलिकडं

बानूबाईचं याड लागलं, मल्हारी देव मल्हारी

इसरून गेला कुण्या झाडाला

भंडारी देव भंडारी

येळकोट येळकोट बोलती

हो नितकाय भंडार उधळती

येळकोट येळकोट बोलती हो

नितकाय भंडार उधळती

नवलाख पायरी गडाला हो, चिरा जोडिला खडकाला

अवं बोला हो तुम्ही बोला,

अवं म्हाळसा नारीला

भंडार वाहू देवाला हो मल्हारी रायाला

मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी

गळा घालितो भंडारी देव मल्हारी


मल्हारी मार्तंड

जय मल्हार

मल्हारी मार्तंड

जय मल्हार

मल्हारी मार्तंड

जय मल्हार

मल्हारी मार्तंड

जय मल्हार

मल्हारी मार्तंड जय मल्हार

मल्हारी मार्तंड जय मल्हार

जय मल्हार

आरती देव्हारा




अनंत युगाचा देव्हारा, बा युगाचा देव्हारा
निज बोधाचा घुमारा, बा बोधाचा घुमारा
अंगी अवचित भरला वारा, बा अवचित भरला वारा
या या मल्हारी देवाचा, या मल्हारी देवाचा ||१||
        शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बा सत्वाचा कवडा मोठा ||धृ||

बोधे ब्रीद बांधिला गाठा, बा ब्रीद बांधिला गाठा
अंगी वैराग्याचा पट्टा, बा वैराग्याचा पट्टा
चारी वाटा त्याभक्तीच्या, चारी वाटा त्याभक्तीच्या ||२||
        शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बा सत्वाचा कवडा मोठा ||धृ||

उदर कोंडीबा सांगाती, बा कोंडीबा सांगाती
घोळ वाजवी अनुहाती, बा वाजवी अनुहाती
ज्ञान भंडाराची पोती, बा भांडाराची पोटी
रिती न होये कल्पांती, रिती न होये कल्पांती ||३||
        शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बा सत्वाचा कवडा मोठा ||धृ||

लक्ष चौऱ्यांशी घर चारी, बा चौऱ्यांशी घर चारी
या या देवाची केली वारी, मी देवाची केली वारी
प्रसन्न झाले देव मल्हारी, बा झाले देव मल्हारी
सोहंभावे राहविले, सोहंभावे राहविले ||४||
        शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बा सत्वाचा कवडा मोठा ||धृ||

या या देवाची भरते वारी, देवाची भरते वारी
गुरगुर करी वेडे चारी, बा करी वेडे चारी
अंगी प्रेमाचे फेंपरे, बा प्रेमाचे फेंपरे
दास तू कथा बोलला, दास तू कथा बोलला ||५||
        शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बा सत्वाचा कवडा मोठा ||धृ||

आरती फुलवरा



जय जगदंबे पूर्ण कदंबे, जय उद देह तुज अर्पिला

देह तुज अर्पिला, तुज म्या फुलवरा बांधिला ||धृ||


आई भवानी थोर जाणुनी, तुज म्या उपवासिले

हाती परड देऊनी, तिने मज भिकेसी लाविले

खुळा पांगळा करुनी, आपणा जवळी बैसविले

उदय अस्ता फिरे गरगरा भुते बावरा

परी तो व्यर्थची शीण वाटला ||

तुज म्या फुलवरा बांधिला ....


माझे घरी भैरव पाहुणा येऊनी बैसला

त्रिगुणाची त्रिशुळ करोनी, प्रपंच विस्तारीला

जोगी बोलागुनी फत्तर पुजोनी भराड म्या घातला

स्थानचिये परी, वृथा गुरगुरी जाय चाचरी

परी देव नाही देखिला ||

तुज म्या फुलवरा बांधिला ....


मुंजोबाची डअक भरोनी मेसाई आळविली

त्रिगुणाची टिवय करोनी तिजवरी बैसविली

धूप दौप नैवद्य तिजला पंचारती केली

ऐसे याचे बळ, सोसू वर्दळ, झाले निष्फळ

सुखाचा केश नाही लाभला ||

तुज म्या फुलवरा बांधिला......


वारी मागता पोट भरेना मग बहू शीण पावलो

आपले जे का सज्जन, त्या वाचूनी उभारिले

खंडोबाचा नवस करोनी मुरली होहुनी बैसले

तिने नाहीले, दुःख दाविले सुख भंगीले

लोटूनी दिधले मला ||

तुज म्या फुलवरा बांधिला......


डोळा घालुनी अंजन, घेऊनी गेले मज राऊळी

विटेवरी जगदंबा माझे, नयनी देखीयली

मनोभावे वर्दळ वृत्ती, देहाची खुंटली

एका जनार्दनीं भले दैत्य हरपले ऐक्य संचले

जन्म मरण पट फाटला ||

तुज म्या फुलवरा बांधिला......


जय जगदंबे पूर्ण कदंबे, जय उद देह तुज अर्पिला

देह तुज अर्पिला, तुज म्या फुलवरा बांधिला ||धृ||

जय श्रीविश्वमाता

नवरात्र नव दिवस बैसे सिंहासनी

अगाध महिमा वर्णू मी काही

शुंभ नि शुंभ दैत्य मर्दानीया चरणी

पुष्प वृष्टी केली देव मिळोनी ||१||

        जयदेव जयदेव जय विश्वमाते

        आरती ओवाळू तुजला गुणवंते ||धृ||


राम लक्ष्मण तुझे वरदान

लेणे विजयी झाले दशमुख अवतार

राज्य स्थापूनिया भक्त बिभीषण

लंकापती  केली निजरूप मिळवणं ||२||

        जय जय जीवदानी, स्थापना केली आनंदानी

        आरती करू बाराची माझ्या जीवदानी आईची ||धृ||


तुळजापूर महिमा वर्णू मी काही

ऐकोनिया भक्त श्रावणी लवलाही

जोगवा मागता प्रसन्न तू बाई

म्हणोनि भक्त लागती ते तुज पायी ||३||

        जय जय जीवदानी, स्थापना केली आनंदानी

        आरती करू बाराची माझ्या जीवदानी आईची ||धृ||

श्रीकुलस्वामिनी

 

कुलस्वामिनी दुर्गामाता सिंहासनी बसली

मला ही जगदंबा दिसली || धृ || 


सांबशिवाची आदिशक्ती

माया म्हणुनी जीव घाबरती

प्रभूकृपेने कळली मला हि माय माझी माउली || १ ||


गोडीवाचून गुळ असेना

शाक्तीवाचून शिव दिसेना

शिवशक्तीचे मिलन एकच खुण मला पटली || २ ||


शुंभ नि शुंभ मर्दन करिते

निजपाठी भक्ता भारा देते

रामचंद्रकृपे राधिकेच्या हृदयी ही ठसली || ३ || 

माहूर गडावरी

 माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास । भक्त येती ते दर्शनास ॥ धृ॥


पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टीदार

अंगी चोळी ती हिरवीगार ।

पितांबराची ग पितांबराची खोविली कास ॥ भक्त येती ॥


बिंदी बिजवरा गं बिंदी बिजवरा गं भाळी शोभे ।

काफ बाल्याने कान ही साजे ।

इच्या नथेला ग इच्या नथेला ग हिरवे घोस ॥ भक्त येती ॥


सरीठुसीत गं सरीठुसीत मोहनमाळ ।

जोडवे मासोळ्या पैंजन चाळ ।

पट्टा सोन्याचा गं पट्टा सोन्याचा शोभे कमरेस ॥ भक्त येती ॥


जाईजुईची गं जाईजुईची आणिली फुले ।

तुरे हार माळीने गुंफीयेले ।

गळा शोभे तो गं रुप शोभे तो गं । आनंदास ॥ भक्त येती ॥


हिला बसायला गं हिला बसायला चांदीचा पाट ।

हिला जेवायला चांदीचे ताट ।

पुरण पोळीची ग पुरण पोळीची आवड सुरस ॥ भक्त येती ॥


मुखी तांबुल पाचशे पानांचा ।

मुखकमली रंग लालीचा ।

खणानारळाची खणानारळाची ओटी तुला ॥ भक्त येती ॥


विष्णुदासाची गं विष्णुदासाची विनवणी तुला ।

माझ्या जनार्दनी चरणी माता भगिनींना गं माता भगिनींना सौभाग्यदायी

व्हावे अखंड अखंडीत पावनी

सदा उधळती गं सदा उधळती गं हळदीला ॥भक्त येती ॥

श्रीजीवदानी देवीची आरती

जय जय जीवदानी, स्थापना केली आनंदानी

आरती करू बाराची माझ्या जीवदानी आईची ||धृ||


आई तू गडावरती राहसी येथे तू सदाची

आई तुझे आहेत भक्त संकटातून करी मुक्त

आता आहेत बाकी भक्त तुझे दर्शन साक्षात ||१||

             जय जय जीवदानी, स्थापना केली आनंदानी

            आरती करू बाराची माझ्या जीवदानी आईची ||धृ||


जे जे येथे आले आहेत आई तुझ्या सेवेला

आशीर्वाद देसी त्यांना पुन्हा येतील या कडेला ||२||

             जय जय जीवदानी, स्थापना केली आनंदानी

            आरती करू बाराची माझ्या जीवदानी आईची ||धृ||


मी आहे आता उभा आई तुझ्या स्थानाला

साष्टांग नमस्कार आहे माझा आई तुजला ||३||

             जय जय जीवदानी, स्थापना केली आनंदानी

            आरती करू बाराची माझ्या जीवदानी आईची ||धृ||

याग कोल्हापुरी

याग कोल्हापुरी | स्वारी कुणाची आली |

आम्ही पाहिली ग | वाघावरी बैसलेली |

पिवळी पैठणी ग | पैठणी नेसलेली |

हिरवी कांचोली ग | अंगामध्ये घातलेली ||


तिच्या कपाळी ग | चंद्रकोर लावलेली |

तिच्या हातात ग | परशु घेतलेली |

तिच्या कमरेला ग | तलवार चमकली |

दुष्ट दुर्जनांचा | संव्हार करीत आली ||


कुणी म्हणती ग | म्हणती अंबिका तिला |

कुणी म्हणती ग | म्हणती रेणुका तिला |

कुणी म्हणती ग | म्हणती भवानी तिला |

बहु नामानिग | नामानी प्रसिद्ध झाली ||

जीवदानी माता पडते मी पाया




जीवदानी माता पडते मी पाया, काय मागू मागणे ||धृ||

कपाळाचे कुंकू अखंड राहू दे, हेच माझे मागणे ग देवी ||

नाकातली नथ अखंड राहू दे, हेच माझे मागणे ग देवी ||

गळ्यातले मंगळसूत्र अखंड राहू दे, हेच माझे मागणे ग देवी ||

हातातला हिरवा चुडा अखंड राहू दे, हेच माझे मागणे ग देवी ||

पायातली जोडवी अखंड राहू दे, हेच माझे मागणे ग देवी ||

पातकरांचे कुटुंब अखंड राहू दे, हेच माझे मागणे ग देवी ||

देवीच्या देऊळात




देवीच्या देवळात कोण ग उभी,
ओटी भरायला मी आहे उभी ||१||

आई जगदंबे दर्शन दे ग मला, मी थांबू कुठवरी ||धृ||

महाराष्ट्राची कुलस्वामिनी,
भगवा झेंडा फडकेवरी ||२||

आई जगदंबे दर्शन दे ग मला, मी थांबू कुठवरी ||धृ||

पिवळे पातळ, हिरवी चोळी,
खणा नाराळाने ओटी भरी ||३||

आई जगदंबे दर्शन दे ग मला, मी थांबू कुठवरी ||धृ||

एका जनार्दनी पूर्ण कृपेने
दैत्य मारिले, भक्त रक्षिले ||४||

आई जगदंबे दर्शन दे ग मला, मी थांबू कुठवरी ||धृ|| 

आईचा जोगवा


अनादी निर्गुण, निर्गुण प्रगटली भवानी

मोह महिषासुर, महिषासुर मर्दाना लागुणी

त्रिविध तापाची, तापाची करावया झाडणी

भक्त लागोनी तू पावसी निर्वाणी ||१||

        आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेन ||धृ||


द्वैत सारूनी, सारुनी माळ मी घालीन

हाती बोधाचा झेंडा मी घेईन

भेद रहीत वारीला जाईन ||२||

        आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेन ||धृ||


नवविध भक्तीच्या, भक्तीच्या करिन नवयात्रा

करुनी पोटी मी, पोटी मी मागेन ज्ञानपुत्रा

धरीन सद्भाव, सद्भाव अंतरीच्या मित्रा

दंभ संसार सांडीन कुपात्रा ||३||

        आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेन ||धृ||


पूर्ण बोधाची, बोधाची घेईन परडी

आशा तृष्णेच्या, तृष्णेच्या पाडीन दरडी

मनो विकार, विकार करवंडी

अद्भुत रसाची भरीन दुरडी ||४||

        आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेन ||धृ||


आता साजणी, साजणी झाले मी नि:संग

विकल्प नवऱ्याचा, नवऱ्याचा सोडियेला संग

काम क्रोध हे, क्रोध हे झोडियेला मार्ग

केला मोकळा मार्ग हा सुरंग ||५||

        आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेन ||धृ||


ऐसा जोगवा, जोगवा मागुनी ठेविला

जाऊन महाद्वारी, महाद्वारी नवस मी फेडीला

एका जनार्दनी, जनार्दनी एकपणे देखिला

जन्म मरणाचा फेरा मी चुकविला ||६||

        आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेन ||धृ||

दे बाई दे जोगवा दे

 


दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग आता, जोगवा दे ||धृ||

मंगळवारी, शुक्रवारी नाही सारविले घर,

आई अंबाबाई एवढा गुन्हा माफ कर,

आता जोगवा दे ||१||


आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुबा,

तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा,

आता जोगवा दे ||२||


आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ,

तुझ्या नथी आहे हिरा नवलाख,

आता जोगवा दे ||३||


आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये सरी,

नवखंडा मध्ये तुझी हरविली दोरी,

आता जोगवा दे ||४||


आई अंबाबाई तुझी हिरवी हिरवी साडी,

भंडारा उधळीत पिवळी पिवळी झाली,

आता जोगवा दे ||५||


एकाजनार्दनी आई तू अंबा माता,

भक्तांना पावतेस तू जगदंबा,

आता जोगवा दे ||५||

मिठा पिठाचा जोगवा



मिठा पिठाचा जोगवा याहो बायांनो दरबारी

मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी ||धृ||



तुळजापूरला जाईन आईला कुंकू घेईन ग

आई आंबेला लावीन ग परत माघारी येईन ||१||

        मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी ||धृ||



तुळजापूरला जाईन आईला बांगड्या घेईन ग

आई आंबेला घालीन ग परत माघारी येईन ||२||

        मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी ||धृ||



तुळजापूरला जाईन आईला हारवेणीघेईन ग

आई आंबेला घालीन ग परत माघारी येईन ||३||

        मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी ||धृ||



तुळजापूरला जाईन आईला साडीचोळी घेईन ग

आई आंबेला नेसवीन ग परत माघारी येईन ||४||

        मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी ||धृ||



तुळजापूरला जाईन आईला नैवेद्य करिन ग

आई आंबेला दाखवीन ग परत माघारी येईन ||५||

        मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी ||धृ||

वणीच्या गडावर कोण ग उभी

वणीच्या गडावर कोण ग उभी ? राखण करते सप्तशृंगी, अंबिका, धाव पाव लवकर नी येऊ दे गडावरी ... अंबिका, धाव पाव लवकर नी येऊ दे गडावरी ... || धृ || ...