Wednesday, August 11, 2021

आरती फुलवरा



जय जगदंबे पूर्ण कदंबे, जय उद देह तुज अर्पिला

देह तुज अर्पिला, तुज म्या फुलवरा बांधिला ||धृ||


आई भवानी थोर जाणुनी, तुज म्या उपवासिले

हाती परड देऊनी, तिने मज भिकेसी लाविले

खुळा पांगळा करुनी, आपणा जवळी बैसविले

उदय अस्ता फिरे गरगरा भुते बावरा

परी तो व्यर्थची शीण वाटला ||

तुज म्या फुलवरा बांधिला ....


माझे घरी भैरव पाहुणा येऊनी बैसला

त्रिगुणाची त्रिशुळ करोनी, प्रपंच विस्तारीला

जोगी बोलागुनी फत्तर पुजोनी भराड म्या घातला

स्थानचिये परी, वृथा गुरगुरी जाय चाचरी

परी देव नाही देखिला ||

तुज म्या फुलवरा बांधिला ....


मुंजोबाची डअक भरोनी मेसाई आळविली

त्रिगुणाची टिवय करोनी तिजवरी बैसविली

धूप दौप नैवद्य तिजला पंचारती केली

ऐसे याचे बळ, सोसू वर्दळ, झाले निष्फळ

सुखाचा केश नाही लाभला ||

तुज म्या फुलवरा बांधिला......


वारी मागता पोट भरेना मग बहू शीण पावलो

आपले जे का सज्जन, त्या वाचूनी उभारिले

खंडोबाचा नवस करोनी मुरली होहुनी बैसले

तिने नाहीले, दुःख दाविले सुख भंगीले

लोटूनी दिधले मला ||

तुज म्या फुलवरा बांधिला......


डोळा घालुनी अंजन, घेऊनी गेले मज राऊळी

विटेवरी जगदंबा माझे, नयनी देखीयली

मनोभावे वर्दळ वृत्ती, देहाची खुंटली

एका जनार्दनीं भले दैत्य हरपले ऐक्य संचले

जन्म मरण पट फाटला ||

तुज म्या फुलवरा बांधिला......


जय जगदंबे पूर्ण कदंबे, जय उद देह तुज अर्पिला

देह तुज अर्पिला, तुज म्या फुलवरा बांधिला ||धृ||

No comments:

Post a Comment

वणीच्या गडावर कोण ग उभी

वणीच्या गडावर कोण ग उभी ? राखण करते सप्तशृंगी, अंबिका, धाव पाव लवकर नी येऊ दे गडावरी ... अंबिका, धाव पाव लवकर नी येऊ दे गडावरी ... || धृ || ...