नमस्कार,
सध्याचं युग हे technology युग आहे आणि आता काही दिवसात 5G हि चालू होणार आहे त्यामुळे पुढे इंटरनेट शिवाय मनुष्याचं पान हि हलू शकणार नाही. ज्याच्या त्याच्या हात स्मार्ट फोन आहे आणि सर्व गोष्टी मनुष्य आता हातात असलेल्या मोबाईल मध्येच पहात आहे. सुरवातीला बँकचे व्यवहार मनुष्य बँकेत जाऊनच करत असत, पण मोबाईलमुळे आता तेही आता सोप झालं आहे. माणसाने प्रगती करणे हि काळाची गरज आहेच, आणि ती केलीही पाहिजे. पण ह्याच technology चा वापर आपण आपली संस्कृती टिकवण्यासाठीही करू शकतो ना? त्यासाठीच मी हा एक प्रयत्न केला आहे. आता आपले सर्व हिंदू धर्माचे सण सुरु होतील , गणेशोत्सव त्यानंतर नवरात्र उत्सव असेल. म्हणून मी एक नवीन ब्लॉग बनवत आहे, ह्या मध्ये नवरात्ज्यारउत्सवात ज्या देवांच्या आरत्या आणि भजन गायले जातात त्याचं ह्या ब्लॉग मध्ये सविस्तर शब्दांच्या रुपात मांडल्या आहेत. म्हणजे केव्हाही आणि कुठेही ह्याचा आनंद कोणत्याही क्षणी आपण घेऊ शकतो. कृपया तुमची साथ ह्या उपक्रमात मला मिळावी हि विनंती. आपण हा ब्लॉग सर्वाना share करून हा अनमोल ठेवा सर्वांपर्यंत पोहोचवावा हि नम्र विनंती.
मी अभिजीत विलास पातकर, रा. ऐरोली, नवी मुंबई. तुमच्या साठी घेऊन आलोय नवरात्रातील देवींची सर्व आरती आणि गाणी.
नवरात्र उत्सव हा आपल्या हिंदू संस्कृती मध्ये एक महत्त्वाचा उत्सव समजला जातो. पण खास करून घटस्थापना म्हणून साजरा केला जातो. ह्या नऊ दिवसासाठी देवी आणि देव घटी बसले आहेत असे समजले जाते. काही पुराणात तर ह्या नऊ दिवसांमध्ये आदिशक्तीच आणि महिषासुर राक्षसासोबत तुंबळ युद्ध चालू होते आणि शेवटच्या दिवशी आदिशक्ती महिषासुर राक्षसाचा वध करते अशीही आख्यायिका आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला देवीच्या घटांची स्थापना केली जाते. म्हणून ह्या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुळाच्या देवता म्हणजे कुळदेव आणि कुळस्वामिनी याचं स्मरण म्हणून देवी देवतांच्या आरत्या आणि गाणी गाऊन जागरण केले जाते.
धन्यवाद !!!!!!
Blogspot : https://abhijeets-way.blogspot.com/
Like करा ..... share करा .... Subsrcibe करा
YouTube Channel : Abhijeet's Way
Facebook Page : Abhijeet's Way
Instagram ID : abhijeetsway
No comments:
Post a Comment