Wednesday, August 11, 2021

करुणाष्टके



जय परात्परे पूर्ण चिन्मये, भगवती महा मंगलालये । 

अगाध ईश्वरी विश्व व्यापिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।१।।


दीन वत्सले पाय दाखवी, तारि भैरवी या भवार्णवि । 

निवारि तापावो आनंद दायिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।२।।


प्रपंच काननी टाकिले मला, मार्ग चूकलो ध्यातसे तुला । 

तुझे कृपे विणे भय कसे चुके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।३।।


परम मूढवो जाण निश्चये, घडे मनासी हे नाम हि न ये । 

म्हणवितो तुझा रंक कालिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।४।।


विषय जाळिया चहूकडे अती, काम क्रोध हे व्याघ्र गर्जती । 

राख संकटी भ्रांती नाशिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।५।।


हेची मागणे लाविसी मनि, हृदय ग्रंथी हे छेदी योगिनी । 

नुपेक्षी कदा भक्त पालिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।६।।


आश्रयो नसे आणखी जनी, बालकासी तू सांडीसि वनी । 

धाव घे कडे, माये रेणुके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।७।।


काही नाठवे विचार हि मनी, वृथा भ्रमतसे दिवस यामिनी । 

प्रकट होय तू ज्ञान दीपिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।८।।


श्रीदयानिधे त्रिपुर सुंदरी, सर्व साक्षिणी भेटी लवकरी । 

गोसावी नंदना विनवी चंडिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।९।। 

No comments:

Post a Comment

वणीच्या गडावर कोण ग उभी

वणीच्या गडावर कोण ग उभी ? राखण करते सप्तशृंगी, अंबिका, धाव पाव लवकर नी येऊ दे गडावरी ... अंबिका, धाव पाव लवकर नी येऊ दे गडावरी ... || धृ || ...