Wednesday, August 11, 2021

श्रीदत्ताची आरती

 


त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।

त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।

नेती नेती शब्द न ये अनुमाना॥

सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥


जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।

आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥


सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।

अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥

पराही परतली तेथे कैचा हेत ।

जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥


दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।

भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥

प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।

जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥


दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।

हरपले मन झाले उन्मन ॥

मी तू पणाची झाली बोळवण ।

एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥


No comments:

Post a Comment

वणीच्या गडावर कोण ग उभी

वणीच्या गडावर कोण ग उभी ? राखण करते सप्तशृंगी, अंबिका, धाव पाव लवकर नी येऊ दे गडावरी ... अंबिका, धाव पाव लवकर नी येऊ दे गडावरी ... || धृ || ...